ताज्या घडामोडी

महाशिवरात्री निमित्त बनेश्वरला (नसरापूर) पुणे महानगर परिवहन महामंडळच्या (PMP) जादा बसेस धावणार


पुणे : महाशिवरात्री निमित्त बनेश्वर (नसरापूर), मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी बुधवार 26 फेब्रुवारी रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कात्रज सर्पोद्यान या महत्त्वाच्या बसस्थानकांवरून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे शहर व ग्रामीण भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी बनेश्वर मंदिर या ठिकाणी जातात. त्यामुळे भाविकांची गर्दी होते. त्यामुळे कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाटापर्यंत), या ठिकाणावरून PMP च्या जादा बसेस धावणार आहेत. भाविकांनी PMP कडून करण्यात आलेल्या नियमित व जादा बससेवेची नोंद घेऊन बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन PMP प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

कात्रज सर्पोद्यान येथून बनेश्वर (चेलाडी फाटा) येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे 5:30 वाजता सुरु करण्यात येईल, नियमित सुरू असणारे कात्रज ते सारोळामार्गे कापूरहोळ, कात्रज -सर्पोद्यान ते वेल्हे व कात्रज-सर्पोद्यान ते वांगणीवाडी या मार्गावर 9 बसेस व यात्रेसाठी 2 जादा बसेस अशा एकूण 11 बसेस सरासरी 20 मिनिटांच्या वारंवारीतेने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!