महाराष्ट्र क्रिकेट संघात भोर तालुक्यातील मोहरी गावच्या युवराज पांगरकरची निवड
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर झाला असून भोर तालुक्यातील मोहरी गावचा युवराज नारायण पांगारकर याची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.
महाराष्ट्र अंडर 14 क्रिकेट संघात निवड झालेल्या युवराजला त्याच्या वडिलांकडून लहानपणापासूनच क्रिकेटचे बाळकडू मिळाले आहे.त्याचे वडील नारायण पांगारकर हे मोहरी गावचे माजी आदर्श सरपंच आहेत, भोर तालुक्यात नावाजलेले शेतकरी म्हणून परिचित आहेत. ते अनेक वर्षापासून आधुनिक पद्धतीने शेती करत असून त्यांनी युवराजच्या सरावात अजिबात खंड पडू दिला नाहीं, त्यांनी लहानपणा पासूनच त्याला क्रिकेटचे धडे दिले. त्यामुळे युवराज हा उत्तम फलंदाज व गोलंदाज बनु शकला आहे तो आळंदे येथील आप्पासाहेब बांदल माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. युवराज हा नऱ्हे तसेच पुणे येथील बाणेर क्रिकेट अकॅडमी येथे वीर सर व लखन बोरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल कापूरहोळ गावचे छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे यांचे वंशज पै. राहुल गाडे, समीर गाडे, विशाल गाडे यांनी बुधवार 22 जानेवारी 2025 रोजी युवराज याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्याच्या या यशात त्याचे आई – वडील प्रशिक्षक वीर सर, बोरसे सर तो शिक्षण घेत असलेल्या शाळेमधील शिक्षक वर्ग यांचा मोलाचा सहभाग आहे.
महाराष्ट्र अंडर 14 क्रिकेट संघ 2024-25
1) विहान हंसलिया – कर्णधार
2) युवराज पांगारकर – उपकर्णधार
3) शौर्य जाधव
4) अर्णव विक्रांत पाटील
5) रिदान ठक्कर
6) आर्यन कित्तुरे
7) झिदान मंगा
8) शौर्य देशमुख
9) कुलवंश वाकोडे
10) अर्णव खिरीड
11) शंकर्षण खांडेकर
12) शारव शहा
13) सोहम चव्हाण
14) व्यंकटेश तडवळकर
15) शिव निळकंठ




