क्राईम

शरीरसौष्ठव स्पर्धेकरिता निघालेल्या जिम ट्रेनरचा अपघाती मृत्यू


कापूरहोळ : रविवार 19/01/2025 रोजी नसरापूर येथील शरीर सौष्ठव स्पर्धा पाहण्यासाठी निघालेल्या जिम ट्रेनर अमोल दुरकर वय 26 वर्ष राहणार भोलावडे ता. भोर या तरुणाचा सायंकाळी 7:30 वाजण्याचे सुमारास मौजे कापुरहोळ ता. भोर जि.पुणे गावच्या हद्दीत भोर- कापुरहोळ रोडवरील बारामती अग्रो लिमिटेड रोहन डेअरी फार्म जवळ अपघात झाला या अपघातामध्ये अमोलचा जागीच मृत्यू झाला.

राजगड पोलीसांनी दिलेला माहितीनुसार ज्ञानेश्वर गुलाब बाबर रा.वीर ता. पुरंदर जि.पुणे. याने त्याचे ताब्यातील डम्पर नंबर MH 12 XM 4453 भरधाव वेगात वाहतुक नियमाकडे दुर्लक्ष करून अचानक उजव्या बाजुला वळण घेवुन  बाजुने मोटारसायकल क्रमांक MH 12 PJ 4984 हिस धडक देऊन सदर अपघात केला. या अपघातामध्ये तरुणाच्या तोंडास व डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला,

Advertisement

डंपर चालक ज्ञानेश्वर गुलाब बाबर याच्या विरुध्द राजगड पोलीस ठाण्यामध्ये गु. र. नं. 23/2025 BNS 106(1), 125 (a) (b), 281मो. वा. का. क 184, 119 या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, अमोल हा भोरमधील एक उत्कृष्ट जिम ट्रेनर होता, त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोकाकळा पसरली आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड व कोल्हे करत आहेत.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!