भोरची कन्या पै.अर्पिता गोळेची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी निवड ! जिल्ह्याचाही अभिमान उंचावला
बारामती : सोमेश्वरनगर तालुका बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या पुणे विभागीय महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत ५३ किलो वजन गटात भोर तालुक्यातील अर्पिता गोळे हिने चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाच्या जोरावर अर्पिताची निवड राजस्थानमधील कोटा येथील कोटा युनिव्हर्सिटी आयोजित ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.
अर्पिता गोळे ही भोर तालुक्यातील पहिली महिला पैलवान ठरली आहे जिने राज्यस्तरीय पातळीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या या निवडीमुळे भोर परिसरासह सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे उत्स्फूर्त अभिनंदन केले आहे.
अर्पिता सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असून, शिक्षणाबरोबरच ती कुस्ती या पारंपरिक खेळातही निपुण ठरली आहे. तिच्या सातत्यपूर्ण सराव, परिश्रम आणि खेळाडूवृत्तीमुळेच हे यश तिला मिळाल्याचे तिच्या प्रशिक्षकांनी सांगितले.दैनिक ‘पुण्यनगरी’शी बोलताना अर्पिता म्हणाली, “शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही मुलींना संधी मिळायला हवी. सांघिक तसेच वैयक्तिक खेळांमधून आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या गावाचे नाव गौरवाने उज्वल करण्याची संधी मिळते.”
यावेळी अर्पिता म्हणाली, “शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही मुलींना संधी मिळायला हवी. सांघिक तसेच वैयक्तिक खेळांमधून आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या गावाचे नाव गौरवाने उज्वल करण्याची संधी मिळते.”अर्पिताच्या पुढील ऑल इंडिया स्पर्धेसाठी भोरकर नागरिक, शिक्षकवर्ग आणि सहाध्यायी विद्यार्थी वर्गाकडून तिला शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तिच्या यशामुळे भोर तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले




