भोर शहरातील झुंजार मित्र मंडळाच्या विघ्नहर्ताचे मोठया उत्सवात स्वागत
भोर : भोर शहरातील झुंजार मित्र मंडळाकडून विघ्नहर्ताची भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली यावेळी प्रमुख आकर्षण कोल्हापूरच्या माधुरी हत्तींनीची प्रतीकृती वर झुंजारचा विघ्नहर्ता विराजमान होता. गणेशभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर आणि जय घोषांच्या उत्साहात गणरायाचे स्वागत केले.
शहरातून काढलेल्या भव्य मिरवणुकीत पारंपरिक पोशाखातील गणेशभक्तांनी बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष साजरा केला, गणपती बाप्पा मोरया या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले होते, मिरवणुकीमध्ये घराघरांतुन व सोसायट्यांमधील महिला भगिनी गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यास गर्दी करत होते.
भोर शहरातील यशवंत डाळ (मामा) व रामचंद्र आवारे (साहेब) या दोन प्रसिद्ध उद्योजकांच्या हस्ते मुर्तीची प्रतिष्ठापना करून त्यानंतर महाआरती घेण्यात आली, मंडळाकडून परिसरात रोषणाई, फुलांची सजावट आणि आकर्षक देखावे उभारून वातावरण भक्तिमय करण्यात आले.
झुंजार मित्र मंडळाच्या वतीने सजविण्यात आलेल्या मंडपात पारंपरिक व आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. मंडळ श्रद्धा, उत्साह आणि ऐक्याने गणेशोत्सव साजरा करत असून, भोर शहर या दिवसांत गणरंगात न्हाऊन निघाले आहे.




