ताज्या घडामोडी

भोर विधानसभा निवडणुकीत रिपाई (RPI) ठरणार किंगमेकर : सुनील गायकवाड


भोर : दि. 23/10/24 (बुधवार) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) भोर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली, महायुतीत भोर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

भोर विधानसभेत महायुतीचे मित्रपक्ष भाजपा, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला धोरणात्मक निर्णयामध्ये सहभागी करून घेतले जात नाही, कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवला जात नाही, महायुतीच्या कोणत्याच कार्यक्रमांना बोलवले जात नाही,योग्य तो सन्मान मिळत नाही, महायुतीच्या फसवेगिरीला कार्यकर्ते आता कंटाळले आहे, याबाबतीत तालुक्यात महायुतीतील एक ही मित्र पक्ष शब्द काढत नाही.

आंबेडकर विचारांना विरोध करणाऱ्या पक्षा बरोबर राजकीय धाडस करुन अध्यक्ष रामदास आठवले युती केली, त्यामध्ये त्यांनी आंबेडकरी जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय फायदा मिळावा म्हणून, प्रत्यक्षात महायुतीलाच  आंबेडकरी मतांचा राजकीय फायदा झाला, परंतु आंबेडकर जनता अपेक्षितच राहीली.

Advertisement

आगामी निवडणुकीत रिपब्लिक पक्षाच्या कार्यकर्त्याचा अपमान सहन केला जाणार नाही, महायुतीच्या नेत्याने जर आम्हाला राजकीय अस्तित्वाची लढाई करण्यास भाग पाडले तर आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ, महायुतीतील मित्र पक्षांनी गांभीर्याने घेतले नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भोर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड हे स्वतः निवडणूकच्या आखाड्यात उतरणार आहेत. याबाबत त्यांनी सर्वच पदाधिकारी,कार्यकर्ते यांना निवडणुकीचा प्रचारात उतरण्याचे आदेश दिले.

भोर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आजच्या निर्णयामुळे महायुतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे, भोर, राजगड (वेल्हा), मुळशी मध्ये आंबेडकरी चळवळीचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते, या विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरी जनतेची मते निर्णायक ठरू शकतात.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!