बारामतीकरांची लेकीलाच गुलाल उधळण्याची संधी
-
पुणे प्रतिनिधी.
महाराष्ट्राचे नव्हे, पुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेले, व दोन्हीही बाजुने प्रतिष्ठेची केलेली ही निवडणुक बारामती लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाली, बारामती म्हंटल की फक्त पवार आणि पवार यांच्या नावाने ओळखली जाते. त्याच पवारांच्याच घरातीलच दोन उमेदवार एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले,नणंद-भावजयीतील ही लढत झाली,त्यामध्ये नणंद भावजयीच्या वरचढ ठरली आहे,
सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला आहे, राष्ट्रवादी पक्षात फुटीनंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक होत होती, शरद पवार आणि अजित पवार,एकाच घरातील दोन सदस्यांमध्ये झालेली ही निवडणूक प्रतिष्ठेची तर होतीच परंतु दोघांच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अति महत्त्वाची होती,
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून सुनेत्रा पवार मैदानात होत्या. या लढतीत नणंद सुप्रिया सुळेंनी भावजय सुनेत्रा पवार यांना लाखांच्या फरकाने पराभूत केले.
जेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, तेव्हा सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांबाबत बोलताना भावुक झाल्या होत्या. माझी लढाई ही कोणत्याही व्यक्ती विरोधात नाहीये, मी कोणावरही व्यक्तीगत टीका केलेली नाहीये. माझी लढाई ही बेरोजगारी, दडपशाही विरोधात असणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. मोठ्या भावाची बायको ही आई समान असते आणि त्यांनी आमच्या आईला निवडणुकीत उतरवलं, आईला निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्यांना निवडणूक लढवावी लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार यांच्यासोबत भावनिकरित्या जोडलेले होते, तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे. प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता. नणंद-भावजय, मुलगी-सून, राष्ट्रवादीचे दोन गट तसेच महाआघाडी आणि महायुती अशी ही लढत झाली होती,त्यामुळे या लढतीकडे फक्त राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.
शेवटी शरद पवार यांचाच पुर्ण बारामती लोकसभा मतदार संघात बोलबाला असल्याचे दिसुन आले.




