शिक्षण

नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाला नॅककडून “अ “दर्जा प्राप्त


 

केळावडे : नवसह्याद्री शैक्षणिक संकुल नायगाव, ता. भोर, जि. पुणे यांच्या नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाला नॅक कडून  ” अ ” दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव सुके यांनी दिली.

“राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदने” घालून दिलेल्या निष्कर्षानुसार शैक्षणिक प्रक्रियेत संस्थेची कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन कार्य आणि विद्याशाखा सदस्यांचे प्रकाशन, मूलभूत सुविधा तसेच संसाधनांची स्थिती, प्रशासन, आर्थिक स्थिती, ग्रंथालय, प्रयोगशाळा, उपकरणे, संगणक या सारख्या विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सेवा सुविधा, विविध क्षेत्रात महाविद्यालय कोणत्या पातळीवर आहे, तसेच महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग या सर्वाना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचे काटेकोर गुणात्मक क्षमतेने मूल्यांकन व मूल्यमापन केले जात आहे का या सर्व बाबींचा विचार करुन नॅक तज्ञ समितीने ” अ ” दर्जा बहाल केला.

Advertisement

नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाची काही दिवसांपूर्वीच नॅक तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली, तसेच महाविद्यालयातील आजी / माजी विद्यार्थी, पालक, नियोक्तायांची महाविद्यालयाच्या संबंधी मते जाणून घेण्यात आली.

नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाला नॅक कडून ही उच्च श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व वाटचालीमध्ये साथ देऊन वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव सुके, उपाध्यक्षा सायली सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके, विश्वस्त नाना सुके, सचिव गोरख सुके या सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉ. किशोर ओतारी, समन्वयक डॉ. प्रिती मेहता तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे व आभार मानले.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!