ताज्या घडामोडी

ग्राहक तक्रार निवारण मंचाकडुन महिला टेलरला 15,000 रुपयांचा दंड


धाराशिव : दि. 31/7/24 (बुधवार) रोजी ग्राहक मंच्याने एक महत्वपुर्ण निर्णय दिला, एका महिला टेलरला 15000 रुपयांचा दंड ठोठवला आहे,आणि त्यांना मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा सुनावली, प्रकरण असे की स्वाती प्रशांत कस्तुरे नावाच्या महिलेने जानेवारी 2023 मध्ये शहरातील नेहा संत या टेलरिंगचे दुकान चालवणाऱ्या महिलेकडे वर्कचे दोन ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते, अँडव्हान्स पैसे घेऊनही वेळेत ब्लाऊज शिऊन न दिल्याने  ग्राहक तक्रार निवारण मंचा कडे तक्रार केली होती.

टेलरकडे कपडे, ब्लाऊज शिवायला टाकणे आणि ते वेळेवर न मिळणे ही समस्त महिला वर्गाची समस्या असते. एखाद्या वेळेसच असं होतं की टेलर उत्तम शिलाई आणि ते ही वेळेवर करून देत असतो. आणि चांगलं कापड घेतलं की ते नीट शिवून मिळेल की नाही याची शाश्वती देता येत नाही, सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेवर मिळेल का ही चिंता अखिल महिला वर्गाला सतावत असते.

Advertisement

या प्रकरणात टेलर महिलेस एकुण 6 हजार 300 रुपये बिला पैकी 3 हजार रुपये अँडव्हान्स दिले होते. नेहा संत यांनी वेळेवर ब्लाऊज शिवून दिला नाही. प्रत्यक्ष भेटून,फोन, मेसेजद्वारे पाठपुरावा केल्यानंतरही ब्लाऊज मिळत नसल्याने 28 एप्रिल 2023 रोजी स्वाती कस्तुरे यांनी वकील प्रशांत कस्तुरे यांच्या मार्फत ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली होती.

ग्राहक तक्रार निवारण मंचाने बजावलेल्या नोटिसीला प्रतिसाद न देता नेहा संत या सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने 31जुलै 2024 रोजी ग्राहक मंचाने एकतर्फी आदेश पारित करीत नेहा संत यांना 10 हजार रुपये दंड तसेच तक्रारीचा खर्च म्हणून 5 हजार रुपये स्वाती कस्तुरे यांना देण्याचा आदेश दिला आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!