क्राईम

केमिकल मिश्रित ताडी पिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू : पुण्याच्या भोर तालुक्यातील घटना


वसंत मोरे,
प्रतिनिधी.

भोर : अंगसुळे गावात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. विजय शेडगे या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. तसेच गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेने गावातील महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गावातील ताडी विक्री केंद्र आणि अवैध दारूच्या दुकानांची तोडफोड केली.

Advertisement

या घटनेबाबत पोलीस प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही कोणतेही कारवाई होत नसल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले, आत्तापर्यंत चार ते पाच जणांचा या ताडीमुळे मृत्यू झाला आहे, संतप्त महिलांनी ताडी केंद्रावर तोडफोड केली. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून, महिलांनी अवैध ताडी विक्री बंद करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही अशा घटनांमुळे अनेक तरुणांचा मृत्यू झाल्याने महिला व गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

पोलीस प्रशासनाला अवैद्य ताडी व दारू विक्री दुकानांवर कारवाई न केल्यास स्थानिक नागरिक व महिलांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. या गुन्ह्यातील ताडी दुकान मालक, ताडी बनवणारे, व विक्री करणारे सर्वजण फरार असून भोर पोलीस स्टेशनचे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!