ताज्या घडामोडी

श्री क्षेत्र बनेश्वर-नसरापूर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू ! मंदिर रस्ता पुढील २० दिवस बंद !! पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन


नसरापूर : भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिर ते नसरापूर या महत्त्वाच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण मंगळवार (ता. २४) पासून सुरू करण्यात आले असुन पुढील २० दिवसांसाठी हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने भाविक व वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व संरक्षक भिंतींचे बांधकाम सुरू होते. यापूर्वी एकेरी वाहतूक चालू होती, मात्र काँक्रिटीकरणाच्या प्रत्यक्ष कामामुळे संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला आहे , बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांनी नसरापूरच्या जानकीराम मंगल कार्यालयाजवळ वाहने थांबवून पायी प्रवास करावा.

Advertisement

पुणे-साताऱ्याहून येणाऱ्या भाविकांना केळवडे गावाच्या मार्गे मंदिराकडे जाता येईल, मंगळवारी भूमिपूजनाच्या वेळी प्रशासक सरपंच उषा कदम, माजी उपसरपंच नामदेव चव्हाण, संदीप कदम, पीएमआरडीए सल्लागार धीरज गायकवाड व ठेकेदार उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार पीएमआरडीए अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून दर्जेदार कामाचे निर्देश संबंधित ठेकेदाराला दिले असुन सरपंच कदम व चव्हाण यांनी उत्कृष्ट दर्ज्याचे काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या बाजूला प्रारंभ होईल. या काळात अडचणी येतील, तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!