ताज्या घडामोडी

केंजळमध्ये चारा व्यवस्थापनाचा उपक्रम ! पशुपालकांना मका बियाण्यांचे वाटप !! हिरव्या चारा उत्पादनाला प्रोत्साहन


किकवी : दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, तसेच पशुपालकांना हिरव्या चाऱ्याचा शाश्वत पर्याय उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने केंजळ (ता. भोर) येथे चारा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करून महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. गुरुवारी (दि. ५) झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांच्या हस्ते करण्यात आले.

सहायक आयुक्त किशोरकुमार मोुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय चिकित्सालय किकवी अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रोहणजी बाठे यांच्या हस्ते परिसरातील ५३ पशुपालकांना सुमारे २६५ किलो मका बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

Advertisement

पशुधनाला वर्षभर पुरेसा व सकस चारा उपलब्ध होण्यासाठी चारा उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने पशुपालकांना मका लागवडीसाठी प्रोत्साहित करणे, जनावरांची चाऱ्याची गरज भागविणे आणि उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचे सकस चाऱ्यात रूपांतर करण्याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या हवामानात चारा टंचाईवर मात करण्यासाठी नियोजनबद्ध चारा उत्पादनाचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले

या उपक्रमामुळे केंजळसह परिसरातील पशुपालकांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळणार असून, पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न कमी करण्यास मदत होणार आहे.

याप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश पालवे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. होले, व्रणोपचारक जयवंत गायकवाड यांच्यासह परिसरातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!