ताज्या घडामोडी

कापूरहोळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ! दुकाने फोडण्याची मालिका सुरूच !! पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा : अजित उकिरडे, अध्यक्ष व्यापारी संघटना


कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातील कापूरहोळ परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असुन दुकाने फोडण्याची मालिका सुरूच आहे, ज्योतिबा सुपर मार्केटमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत कापूरहोळमध्ये सहा ते सात दुकाने फोडून चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.

कापूरहोळ हे पुणे-सातारा महामार्गावरील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून, येथे विविध व्यावसायिक आस्थापना आहेत. खरेदीसाठी दररोज नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, व्यापारी पेठेतील दुकानांमध्ये चोरीच्या घटना घडत असल्याने व्यावसायिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Advertisement

दिवसभर व्यवसाय करून रात्री दुकाने बंद करून घरी जाताना व्यापाऱ्यांना दुकानातील मालमत्तेच्या सुरक्षेची चिंता सतावत आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे आणि चोरीच्या घटनांचा तपास करून संबंधित चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

कापूरहोळ परिसरातील व्यापाऱ्यांना सुरक्षिततेची हमी मिळावी आणि चोरीच्या घटनांना प्रतिबंध बसावा, यासाठी पोलिसांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित उकिरडे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!