निगुडघर येथे 20 मार्च 1927 चा क्रांती दिन साजरा
भोर : निगुडघर येथे महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह ‘क्रांती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बौध्दजन संघ भोर तालुका यांच्या वतीने कार्यक्रमाचे गेली ९ वर्षे आयोजित करण्यात येते,
आपटी येथील दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांच्या स्तंभाला मानवंदना देण्यात आली. यानंतर निगुडघर येथे बुद्धवंदना, जाहीर सभा, मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
तसेच महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून महाड चवदार तळे या ठिकाणी जाणाऱ्या भिम अनुयायांना भोजन दान, पाणपोई व सरबतची व्यवस्था करण्यात आली होती.
आंबेडकरवादी युवा मंच भोर च्या वतीने भोर स्टॅण्ड ते निगुडघर टु व्हिलर रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाला दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कश्यप साळुंखे, बौध्दजन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सपकाळ, अविनाश गायकवाड, सरपंच मंगल कंक, अनिल गायकवाड, सुनिल मोरे, सतिश गायकवाड, सचिन गायकवाड, अंकुश गायकवाड, पांडुरंग गायकवाड, प्रकाश गायकवाड, मिलिंद साळुंके, विजय गायकवाड, अंकुश साळुंके, बबन गायकवाड, विश्वनाथ सातपुते, दिपक गायकवाड, संतोष जाधव, जगन्नाथ पारठे, शंकर पारठे, हनुमंत पारठे, रवी कांबळे, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, नितीन माने, रणजीत रणखांबे, आकाश गायकवाड, मिलिंद जगताप इत्यादी होते,तसेचआंबेडकर अनुयायी व इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ओव्हाळ, आनंदा सातपुते यांनी केले, प्रास्ताविक अनिल गायकवाड यांनी तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले.




