ताज्या घडामोडी

पायल झांबरेला न्याय मिळवून देण्यासाठी तृप्ती देसाई आक्रमक ! खेडशिवापूर येथे माहेरच्या कुटुंबीयांची घेतली भेट !! खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी


खेडशिवापूर : पुण्यातील विवाहित पायल झांबरे मृत्यू प्रकरणाला आता सामाजिक स्तरावरूनही आवाज उठू लागला असून, सामाजिक कार्यकर्त्या तथा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी (दि. ५) त्यांनी शिवापूर येथील बांडेवाडी (श्रीरामनगर) येथे पायलच्या माहेरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेत त्यांनी न्यायासाठी ठामपणे पाठपुरावा करण्याचा विश्वास दिला.

या प्रकरणातील संशयित आरोपी अक्षता झांबरे-निम्हण हिला तातडीने अटक करण्यात यावी, प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी आणि खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, अशी आग्रही मागणी देसाई यांनी केली. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रकरणाची प्रभावी बाजू मांडणाऱ्या विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, पायलच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून पायलला मानसिक त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

पायलच्या मृत्यूमागील सत्य समोर येऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आपण शांत बसणार नाही. पायलला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार, असा निर्धार तृप्ती देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!