ताज्या घडामोडी

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! शिलाई मशीनसाठी आर्थिक मदतीची संधी !! महिलांनी अर्ज प्रक्रियासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे


भोर : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत शिलाई व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मोफत शिलाई मशीन योजना २०२६’ या नावाने पात्र महिलांना शिलाई मशीन किंवा त्यासाठी आर्थिक मदत मिळत असल्याची माहिती विविध माध्यमांतून प्रसारित होत आहे. मात्र, अर्ज करण्यापूर्वी संबंधित योजनेची अधिकृत माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, श्रमिक व गरजू महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा अशा योजनांचा मुख्य उद्देश आहे. शिलाई मशीनच्या साहाय्याने कपडे शिवणे, कपड्यांची दुरुस्ती करणे तसेच ऑर्डरनुसार शिलाईची कामे करून महिलांना उत्पन्नाचे साधन निर्माण करता येऊ शकते.

Advertisement

उपलब्ध माहितीनुसार अर्जदार महिलेचे वय २० ते ४० वर्षांदरम्यान असावे. काही ठिकाणी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नासंबंधी अटी नमूद करण्यात आल्या आहेत. अर्जासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा, मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड, मोबाईल क्रमांक व पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असू शकतो.

दरम्यान, सोशल मीडियावरील माहितीवर आंधळा विश्वास न ठेवता संबंधित शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कार्यालयात योजनेची पात्रता, लाभ व अर्ज प्रक्रिया पडताळूनच अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!