ताज्या घडामोडी

कापूरहोळमध्ये सुवासिनींनी वडाच्या वृक्षाची पूजा करून मागितले अखंड सौभाग्य


कापूरहोळ : भोर तालुक्यातील ऐतिहासिक कापूरहोळ मध्ये वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त परिसरातील सुवासिनी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या वृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याबरोबरच कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

सकाळपासूनच गावातील मंदिर परिसर आणि वडाच्या झाडाजवळ महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महिलांनी विधिवत पूजा करून वडाच्या वृक्षाला दोरा गुंडाळत वटसावित्रीची कथा श्रवण केली. यावेळी धार्मिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक गीतांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement

वटपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळविल्याच्या पौराणिक कथेशी या व्रताचे महत्त्व जोडले गेले आहे. त्यामुळे विवाहित महिला हे व्रत श्रद्धेने पाळतात.

गावातील विविध महिला मंडळे, बचत गट आणि ग्रामस्थांनी या धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत सामाजिक ऐक्य दृढ करणारा हा उत्सव आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!