ताज्या घडामोडी

कापूरहोळ ग्रामपंचायतीचे ९ वर्षीय हर्षवर्धन गाडे याच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण जाहीर ! तीन वार्डांतील जागांचे आरक्षण निश्चित !! आरक्षण सोडतीने राजकीय गणिते बदलली !!! ९ सदस्यांसह १० जणांची सत्ता


कापूरहोळ : भोर तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या कापूरहोळ ग्रामपंचायतीच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सोडतीत सरपंचपद अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव घोषित झाल्याने गावातील राजकीय घडामोडींना वेग आला असून संभाव्य उमेदवारांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कापूरहोळ ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य व एक सरपंच असे दहा सदस्यांचे प्रशासकीय मंडळ निवडून दिले जाणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार वार्ड क्रमांक १ मध्ये खुला पुरुष दोन जागा व खुली महिला एक जागा निश्चित करण्यात आली आहे. वार्ड क्रमांक २ मध्ये ओबीसी महिला एक, खुला पुरुष एक आणि खुली महिला एक जागा राखीव करण्यात आली आहे. तर वार्ड क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती महिला एक, खुली महिला एक आणि ओबीसी सर्वसाधारण एक जागा निश्चित करण्यात आली आहे.

Advertisement

आरक्षण सोडतीची प्रक्रिया संगमनेर मंडल अधिकारी मनोज ढवळे, तलाठी भाऊसाहेब धम्मपाल शिक्रे, ग्रामसेवक संजय वाकळे, संगणक परिचारिका सुप्रिया बांदल व आकाश गाडे यांच्या उपस्थितीत पार पडली. इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या ९ वर्षीय हर्षवर्धन अभिजीत गाडे याच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण जाहीर करण्यात आले.

यावेळी माजी उपसरपंच पंकज गाडे, माजी सरपंच रत्नप्रभा दळवी, राजेंद्र आहिरे, वसंत सो.गाडे, वसंत ज्ञा.गाडे, अमित गाडे,  मिलिंद जगताप, रामदास लेकावळे, सागर जगताप, रुपेश जगताप, म्हस्कोबा गाडे, सागर गाडे, विशाल दळवी, सुर्यकांत राजीवडे, पप्पु राजीवडे, अजय गाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत गावात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!