भोर तालुक्यातील वरोडी खुर्द येथे ५.४४ कोटी रुपयेच्या पाणी योजनेचा संग्राम थोपटेंच्या हस्ते शुभारंभ
भोर, दि. ५ : भोर राजगड मुळशीचे मा. आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या शुभहस्ते भोर तालुक्यातील मौजे वरोडी खुर्द येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना उद्घाटित करण्यात आली. या योजनेसाठी रु.५ कोटी ४४ लाखांचा निधी खर्च होणार असून, गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. जलसंकट असलेल्या या भागात ही योजना वरदान ठरणार आहे.
कार्यक्रमप्रसंगी राजगड ज्ञानपीठाचे मानद सचिव सौ.स्वरूपाताई थोपटे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.उत्तमराव थोपटे, भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.आनंदा आंबवले, भोर शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री.अतुल किंद्रे, भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस श्री.अमर बुदगुडे उपस्थित होते. वरोडी गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटी चेअरमन व सदस्य, ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग तसेच भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने हजर होते.
आमदार थोपटे म्हणाले, “सरकारच्या कृपेने भोर तालुक्यातील प्रत्येक गाव जलसुरक्षित होईल. ही योजना ग्रामस्थांच्या प्रगतीचे प्रतीक आहे.” ग्रामस्थांनी याबाबत आनंद व्यक्त केला.




