कापूरहोळ-भोर रोडवर कासुर्डी गावच्या हद्दीत भीषण अपघात ! आई-मुलगा जागीच ठार !! अपघातग्रस्त गाडीमध्ये दारुच्या बाटल्या आढळल्या
कापूरहोळ : भोर-कापूरहोळ रोडवर कासुर्डी गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला एम एच १२ व्ही एन ०१०१ क्रमांकाची गाडी वेगाने धावत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडकली. अपघातग्रस्त गाडीत दारूच्या अनेक बाटल्या सापडल्या असून, गाडीत असलेले चारजण मध्य धुंद अवस्थेत होते त्यापैकी दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले व दोघांना अटक करण्यात आली आहे.
या अपघातात आई नंदा लक्ष्मण धावले (वय ५५) व त्यांचा मुलगा अमृत लक्ष्मण धावले (वय २३) हे जागीच ठार झाले. प्राथमिक तपासात दारूच्या नशेत गाडी चालवल्याने अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. अपघातस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय भोर येथे शविच्छेदनासाठी पाठवण्यात आले, राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेने तेलवडी गावात शोककळा पसरली आहे.नंदा धावले या गृहिणी होत्या तर अमृत हा खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. रोजच दारूच्या व्यसनाने अशा भयानक घटना घडत आहेत.




