संगणक परिचारिकांसाठी आनंदाची बातमी,थकीत मानधन देण्याचे शासनाचे आदेश
महाराष्ट्र शासन संपूर्ण भारतात दिवाळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो दिवाळी सणापूर्वी संगणक परिचारकांचे थकीत मानधन मिळावे या मागणी करिता महाराष्ट्र राज्याच्या संगणक परिचारिकांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती, या मागणीला शासनाने मंजुर करत संगणक परिचारिकांचे थकलेले मानधन दिवाळी पूर्वी देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू केली आहे.
प्रत्येक गावातील ग्रामपंचायत मध्ये सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाइन जन्म-मृत्यू दाखले व इतर सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचारिकांची नेमणूक केलेले असते, संगणक परिचारिकांना कंपनीच्या माध्यमातून नियुक्ती देण्यात येते, जून 2024 मध्ये कंपनीचे मुदत संपल्यामुळे शासनाने नवीन कंपनी देण्याची घोषणा केली होती,
नवीन कंपनीच्या माध्यमातून परिचारिकांची नेमणूक केली होती परंतु थकीत वेतन अद्यापही त्यांना मिळाले नव्हते त्यामुळे राज्यातील संगणक परिचारिकांनी थकीत वेतन मिळावे, ही मागणी राज्य शासनाकडे केली होती, राज्य शासनाने या मागणीचा विचार करून दिवाळीच्या अगोदर राज्यातील सर्वच संगणक परिचारिकांना थकीत वेतन देण्याचे आदेश दिले आहेत.




