भोर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचा खंदा कार्यकर्ता योगेश गायकवाड यांचे अपघाती निधन
भोर : भोर तालुक्यातील आंबेडकरवादी युवा संघटनेचे सदस्य समाजकार्याचा झंझावात आणि सर्वांच्या मनातील योगेशदादा गायकवाड (रा. खानापूर) यांचे अपघाती दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण भोर तालुक्यातील आंबेडकर युवा शोकसागरात बुडाला आहे. गायकवाड हे आंबेडकरवादी युवांच्या कार्यात सक्रियपणे सहभागी असणारे तेजस्वी कार्यकर्ते होते. त्यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवून चळवळीच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण केली.
भोर तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यक्रम असो वा सार्वजनिक व सामाजिक चळवळीचे उपक्रम त्यात त्यांनी सदैव पुढाकार घेत असत, १४ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वेळी “एक तालुका एक जयंती असा संयुक्त जयंती या कार्यक्रमात पुढाकार घेऊन शिस्तबद्ध आयोजनापर्यंत सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होते.
योगेशदादाची कार्यतत्परपणा समर्पण आणि सामाजिक बांधिलकी ही भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा जिद्दी, निष्ठावान आणि ध्येयवादी कार्यकर्ता समाजातून निघून गेला, याचे दुःख शब्दांत मावणार नाही. आंबेडकरी चळवळीतील एक कणखर आधारस्तंभ राहिला नाही, भोर तालुका आंबेडकरी युवा यांच्यावतीने योगेशदादा गायकवाड यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.




