कामथडी पंचायत समिती गणात क्रांतीताई धुमाळ यांच्यावतीने महिलांच्या कलागुणांचा गौरव
संगमनेर : कामथडी गणातील गावांमधील गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात पार पडला. भोर तालुक्यातील कामथडी पंचायत समिती गणातील महिलांना आपल्या अंगभूत कलागुणांना संधी मिळावी या हेतूने उद्योजक प्रफुल धुमाळ व त्यांच्या सौ. क्रांती धुमाळ यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमात महिलांनी विविध कल्पकतेने आपल्या घरातील गौरी-गणपती सजावट साकारली. सजावट, सर्जनशीलता आणि सौंदर्य या निकषांवर परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली.
या स्पर्धेत 1) प्रथम क्रमांकाचा विजेतास फ्रिज बक्षीस 2) द्वितीय क्रमांक टी.व्ही. 3) तृतीय क्रमांक वॉशिंग मशिन 4)चतुर्थ क्रमांक आटा चक्की 5) क्रमांक मिक्सर.
पहिल्या पाच विजेत्या महिलांना मानाचे बक्षीस प्रदान करण्यात आले,
तर स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना उत्कृष्ट बक्षीसं क्रांतीताई प्रफुल धुमाळ यांच्या वतीने देण्यात आली.कार्यक्रमात महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. क्रांतीताई प्रफुल धुमाळ यांनी महिलांना स्वरोजगार आणि उद्यमशीलतेच्या दिशेने प्रेरित करणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
कामथडी गणातील मतदार आणि महिला संघटनांनी या उपक्रमाचे कौतुक करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




