भोर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात तिकीटासाठी उमेदवारांत चढाओढ
कापूरहोळ : भोर तालुक्यातील भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तिकीट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत, काही कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीसाठी वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत तर काही जाहिर प्रसिद्धीसाठी वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करत आहेत, मीच पक्षाचा दावेदार आहे हे दाखवण्यासाठी अनेकजण मंत्री, आमदार किंवा इतर नेत्यांसोबतचे फोटो सभागृहात, सोशल मीडियावर आणि फलकावर झळकावत आहेत,
नवीन आणि जुने चेहरे संघटनात निवडणुकीच्या वाऱ्यामुळे अनेक नव्या चेहऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.तालुक्यातील विरोधी पक्षातील काही सदस्य भाजप गटात सामील झाले आहेत, ज्यामुळे जुने व नवीन कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपा शिबिरात स्पर्धेचं वातावरण निर्माण झालं आहे.
स्वराज संस्था आणि राजकीय समीकरणस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला उमेदवारांची निवड करताना मोठं आव्हान आणि दबाव जाणवतो आहे. माजी आमदार संग्राम थोपटे या भाजपमध्ये आल्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरण बदलले आहे; सत्ता आणि विरोधकांचे गट पुन्हा नव्याने तयार होत आहेत.
महायुती सहयोगाचा मुद्दा असूनही भोर तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचारमाध्यमांचा प्रभाव आणि जनतेची भूमिका उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक कार्यकर्ते राजकीय पक्षाची सेवा व जनतेच्या हिताचा मुद्दा वारंवार मांडत आहेत,प्रत्येकाने मी पक्षाचा आणि जनतेचा खरा प्रतिनिधी असल्याचा दावा करत तिकीट मिळवण्यासाठी विविध प्रचारमाध्यमांचा प्रभावी वापर सुरु केला आहे.
मात्र, तिकीट कुणाला मिळेल हे पक्षाच्या अंतर्गत चर्चेवर किंवा नेत्यांच्या विश्वासावर अवलंबून राहील, कोण उमेदवार निवडला जाईल व जनता कोणाला स्वीकारेल, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.




