जन सुरक्षा कायद्याला भोर तालुक्यातील महाविकास आघाडीचा विरोध ! कायदा रद्द करण्याची मागणी
भोर : महाराष्ट्र शासनाने विधानसभेत जन सुरक्षा कायदा मंजुर केल्यानंतर त्या कायद्याला अनेक राजकीय पक्षांकडून कडाडून विरोध केला जात आहे. या कायद्यामुळे लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असल्याने हा कायदा रद्द करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले असून भोर तहसिलदार कचरी समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) व शिवसेना (उ. बा.ठा.) या दोन पक्षाच्या पदाधिकारी आंदोलन केले व तहसीलदारांना जन सुरक्षा कायदा रद्द करण्याचे निवेदन देण्यात आले.
जन सुरक्षा कायदा ‘लोकशाहीविरोधी’ असल्याने तीव्र विरोध दर्शविला. या पार्श्वभूमीवर जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. भोर तहसीलदार कचेरीच्या चौकात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गट ) यांच्यासह डाव्या पक्ष संघटना सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनातून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी महाआघाडीतील राष्ट्रवादी पक्षाचे रवींद्र बांदल,बाबा धुमाळ,भरत बोबडे, शिवसेना पक्षाचे माऊली शिंदे, आदित्य बोरगे, अनिकेत शिंदे, नांगरे पाटील आदी उपस्थित होते.