भोर विधानसभामधील मतदारांनी ज्या अपेक्षांनी निवडुन दिले,तेवढ्याच जास्त अपेक्षांचे तगडे आव्हान समोर आहे
भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून चौथ्यांदा संग्राम थोपटे निवडणूक रिंगणात होते, भोर विधानसभा मतदारसंघ 15 वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्यामुळे या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार देण्याचे आव्हान अजित पवारांना होते, यंदा या मतदार संघामध्ये भोर तालुक्यातील उमेदवार न देता मुळशी तालुक्यातील उमेदवार दिला भोर तालुक्यापेक्षा जास्त मतदान हे मुळशी तालुक्याचे असल्याने शंकर मांडेकर मुळशीतुन चांगले मतदान घेऊ शकतात, तसे झाल्यास संग्राम थोपटेचा पराभव निश्चित होईल याच अपेक्षेने मुळशीचा उमेदवार दिला मुळशी तालुक्याने ही प्रतिसाद देत विजयी आघाडी दिली आणि यामध्ये शंकर मांडेकर यांचा दणदणीत विजय झाला.
भोर विधानसभा ही सीट पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख सीट होती, हा मतदार संघ बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने या मतदारसंघाला विशेष महत्व आहे, पण मतदार संघात काँग्रेसचे संग्राम थोपटे 15 वर्षापासून प्रभुत्व करत होते, ते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे सुपुत्र आहेत, 2009, 2014 आणि 2019 मध्ये विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांनी नेतृत्व केल्यामुळे भोर विधानसभेमध्ये काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. पण शंकर मांडेकर यांच्या विजयाने कॉंग्रेस बॅकफूट वर गेली असल्याचे दिसत आहे.
MIDC (एमआयडीसी), काम-धंद्या करिता स्थलांतरित होणाऱ्या युवकांसाठी रोजगार निर्मिती करणे नवीन उद्योग आणणे, साखर कारखाना, शेती विषयक तसेच इतर समस्याचे प्रश्न,जेवढ्या जास्त मताधिक्यांनी त्यांना मतदाराने निवडून दिले आहे, तेवढ्याच जास्त अपेक्षांचे तगडे आव्हान आमदार शंकर मांडेकर यांच्यासमोर असणार आहे.




