क्राईम

शेतकऱ्याला दारू पाजून सह्या घेऊन त्याची वडिलोपार्जित जमिन विक्री ! सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


 

सासवड : पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील एका शेतकऱ्याची त्याच्या संमती शिवाय, दारू पाजून 6 एकर 10 गुंठे जमिनीची विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एका शेतकऱ्याला आधारकार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने दारू पाजून त्याच्याकडून सह्या घेण्यात आल्या आणि त्याची वडिलोपार्जित जमीन विक्री करण्यात आली. या प्रकरणी रूपाली नरेंद्र जाधव यांनी याबाबत सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून किरण आनंदा भंडलकर आणि सौरभ दादा शितोळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

शेतकरी नरेंद्र जाधव यांना दारू पाजून त्यांच्याकडून अनेक ठिकाणी सह्या घेतल्या,आधारकार्ड लिंक करायचं आहे असं सांगून त्यांची फसवणूक करण्यात आली. फिर्यादी रुपाली जाधव दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशी केली असता किरण भंडलकर आणि सौरभ शितोळे यांनी त्यांच्या जमिनीचे दस्तऐवज तयार केला असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर घटना उघडकीस आली असुन घटनेच्या पुढे तपास सासवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!