सरपंच,पोलिस पाटील,ग्रामस्थ,घर मालक यांनी वास्तव्यास असणाऱ्या भाडेकरूबद्दल माहिती घेणे व देणे आवश्यक आहे ; राजेश गवळी, पोलिस निरीक्षक
कामथडी : गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, गावातील रूम भाड्याने देणारे मालक यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, आपण आप-आपल्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व पोलिसांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने गावामध्ये होणाऱ्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आप-आपल्या हद्दीमधील गावामध्ये कोणी बाहेरील व्यक्ती येऊन वास्तव्य करीत आहेत काय ? आल्यास त्या कोठून आल्यात ? या विषयी माहिती आप-आपल्या गावातील सरपंच,पोलीस पाटील यांनी ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन बाहेरून वास्तव्यास येणाऱ्या व्यक्तींबद्दल त्यांचे आधारकार्ड, मुळगाव, नोकरी किंवा व्यावसायिक माहिती व त्यांच्यातील इतर 2 नातेवाईकांची नावे, मोबाईल नंबर हे माहितीसाठी घेणे आवश्यक आहे व ती माहिती फाईल करून जतन करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे.बऱ्याच वेळा राज्यातून पर राज्यातून वास्तव्यस आलेल्या व्यक्ती या पळून आलेल्या किंवा एखादा मोठा गुन्हा करून आलेल्या असू शकतात.
काही ठिकाणी तर एका रूम मध्ये 5-5 जण भाड्याने राहत असल्याचे निदर्शनास आले आहे, विशेष म्हणजे त्यांच्याविषयी कोणास काही माहिती सांगता येत नाही.काही भाड्याच्या पैशांपोटी आपण चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देत असतो. त्यामुळे प्रत्येक गावातील पोलीस पाटील, सरपंच यांनी सदर बाबत ग्रामसभेमध्ये ठराव घ्यावा. जेणेकरून गावांमध्ये बाहेरील कोणीही अनोळखी व्यक्ती आली असल्यास त्याबद्दल आपल्याला तात्काळ माहिती मिळू शकते.
श्री राजेश गवळी,
पोलिस निरीक्षक,
राजगड पोलिस स्टेशन कामथडी.




