शिक्षण

आपटी माध्यमिक विद्यालयाच्या SSC बॅच 2008-2009 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा, जुन्या आठवणींना उजाळा, भेटवस्तू देऊन कृतज्ञता


भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील आपटी माध्यमिक विद्यालय आपटी येथे  शनिवारी 18 जानेवारी 2025 रोजी SSC  (इयत्ता दहावी) 2008 – 2009 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांचे आभार मानले.

16  वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणी एकत्र आले होते. विद्यालयाच्या इमारतीसाठी कलर देण्यात आला. उपस्थित सर्व शिक्षक, माजी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व पुष्गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी मा.मुख्याध्यापक ताकवले सर, भागवत मॅडम, कडू सर, डेरे सर, माजी विद्यार्थी पंकज पारठे, दिपाली गायकवाड, शर्मिला खाटपे, स्वप्निल पारठे प्रियांका कुडले यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सुदाम पारठे, विठ्ठल साबळे, ओमकार किर्वे, समिर पारठे, भाग्यश्री गोरे, अमोल खुटवड, अशोक परखांदे, साजन धामुनसे, सोनाली मळेकर, अश्विनी अंबिके, सुधिर शेलार, वृषाली बांदल, माधुरी कुडले, मंगल पारठे इत्यादी माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Advertisement

यावेळी स्वराज महाराष्ट्र न्युजशी बोलताना माजी विद्यार्थी व आपटी गावचे विद्यमान उपसरपंच अविनाश गायकवाड म्हणाले  भौतिक साधना गुरफाटून गेलेल्या समाज व्यवस्थेत माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा हे मूल्य हरवत जात आहेत. शैक्षणिक प्रगतीसाठी स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्याध्यर्थ्यांनी  परत शाळेकडे पाहणे, मदत करणे गरजेचे आहे. यातून शैक्षणिक कार्याला बळकटी येत असून नाते घट निर्माण होते,

यावेळी सूत्रसंचालन माजी विद्यार्थी व आपटी गावचे विद्यमान उपसरपंच अविनाश गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक माजी विद्यार्थिनी अश्विनी पारठे यांनी केले, तर रामदास पारठे यांनी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आभार मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!