बिग-बॉस पर्व 5 चा विजेता ठरला बारामतीचा सुरज चव्हाण
बिग बॉस मधील स्पर्धक सुरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवलं होतं. सुरजला सर्वाधिक वोट मिळाले असल्याने ट्रॉफीवर त्याचे नाव कोरले गेले, अभिजीत सावंत उपविजेता ठरला तर निक्की तांबोळीला तिसरं स्थान मिळालं. धनंजय पवार चौथ्या तर अंकिता वालावलकर पाचव्या स्थानावर राहिली. जान्हवी किल्लेकरने सहावा क्रमांक मिळवला.
सुरज चव्हाण हा ज्यावेळी बिग बॉसच्या घरात दाखल आला होता, त्यावेळी अनेकांनी भूवया उंचावल्या होत्या सुरज चव्हाण साधा दिसतो, अस्सल ग्रामीण भागातून सुरज आला असल्याने सुरूवातीच्या काळात सूरजच्या खाण्यापिण्यावरून आणि राहण्यावरून बिग बॉसच्या घरातील काही सदस्य त्याची खिल्ली उडवत होती, सुरज चव्हाण याचे शिक्षणही अत्यंत कमी झाले आहे, आणि त्याला मराठी देखील व्यवस्थित वाचता येत नव्हते.
सुरज चव्हाणची तरूणाई मध्ये एक वेगळीच क्रेझ असल्याची पहावयास मिळते. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ तयार करत महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणाई, विद्यार्थी, कामगार वर्ग सुरज याला मत देण्यासाठी विनंती करत होते आणि त्यांच्या या आशिर्वादाच्या जोरावर सुरज चव्हाण आज बिग बॉसचा विजेता झाला.
विजेत्या सुरजने पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं त्याच्या स्वभावास त्याला साजेस होता, या सगळ्याची घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीला पडला, अगदी शांतपणे खेळत असल्याचे निदर्शनास आले, दरम्यान पहिल्या दिवसापासूनच सुरजला चाहत्यांचा फूल सपोर्ट मिळाला आहे. सुरजने त्याच्या स्टाइलने आणि साधेपणाने प्रेक्षकांची मनंही जिंकून घेतली. त्यामुळे सूरजनेच बिग बॉस मराठी 5 च्या ट्रॉफीवर नाव कोरले. त्याचा चाहत्यां नीची इच्छा पुर्ण झाली,