भोर मतदारसंघातील जनतेचा आशिर्वाद कुलदीप कोंडे यांच्या पाठीशी : विकास चव्हाण
कापूरहोळ : भोर विधानसभेबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पेंजळवाडीचे माजी सरपंच विकासबापू चव्हाण यांनी सांगितले की भोर, राजगड (वेल्हा), मुळशी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय नेते कुलदीप कोंडे अहोरात्र जनसेवेचे काम करीत आहे. एका सर्वसामान्य घरातील माझ्यासारखा तरुण सामाजिक कार्यातून कुलदीप कोंडे कुटुंबाशी जोडला जाऊन कोंडे परिवाराचा एक भाग बनलो हीच भावना मतदारसंघातील माझ्या सर्व सामान्य घरातील सर्व कार्यकर्त्यांची आहे.भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंदुत्वचा विचारांचा वारसा चालवणारे कोंडे यांचे सर्व समर्थक व तळागाळातील आमच्या सारखे कार्यकर्ते नेतृत्वावर विश्वास ठेऊन भोर विधानसभेचा कायापालट करण्यासाठी सर्व मेहनतीस तयार आहोत.
आज भोर तालुक्यातील प्रत्येक गावागावात कुलदीप कोंडे युवा मंच वतीने महिला भगिनींचे आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून मदत केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य शलाका कोंडे यांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी केवळ मागील पाच वर्षात मा.जि.प. सदस्य शलाका कोंडे आणि कुलदीप कोंडे यांनी मंजूर करून आणला आहे. या मोठ्या प्रमाणावरील निधीतून आज मतदारसंघातील वाडी, वस्ती,गल्ली, कॉलनीत प्रशस्त व मजबूत रस्ते, बंधारे, पुल, सामाजिक सभागृह सर्व धर्मीय सर्व जातीय समाजासाठी व त्यांच्या धार्मिक स्थळासाठी, शाळेसाठी, स्मशानभूमीसाठी तसेच शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, विद्यार्थी, महिला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.
प्रत्येकाच्या सुखदुःखात शलाका कुलदीप कोंडे कुटुंब नेहमीच सहभागी असतात. निवडणूक असो वा नसो कोंडे कुटुंबीय अहोरात्र मतदारसंघात नागरिकांची कामे दिसतात.मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद कायम कुलदीप कोंडे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी अनेक, प्रभावी मात्र एकच नेतृत्व म्हणजे कुलदीप कोंडे आहे.




