शिक्षण

RTE प्रवेश प्रक्रियाबाबत होणाऱ्या दिरंगाईमुळे पालकांची चिंता वाढली


 

शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन जून महिना देखील संपला आहे. अद्याप पाल्याचा प्रवेश नसल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांना वाटत आहे. आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी RTE प्रवेशांतर्गत नोंदणी केलेल्या शाळांमध्ये 25 टक्के कोटा राखीव ठेवण्यात येतो. त्यामुळे पालक RTE तुन आपल्या पाल्याचा प्रवेश व्हावा या प्रतीक्षे मध्ये असतात.

दरवर्षी RTE ची प्रवेश प्रक्रिया आता पर्यंत 50 ते 60 टक्के झालेली असते. मात्र, यंदा जुन महिना संपला तरी पालकांना कोणतीही सुचना किंवा माहिती मिळत नाही. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने प्रवेशासाठी पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेशाची यादी जुन महिना संपून देखील RTE प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही. यामुळे संपूर्ण राज्यात पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

न्यायालयाचा निर्णय येई पर्यंत प्रवेश नाकारणे तर, कधी शासना कडुन प्रवेश प्रक्रियेत बदल होणे आणि शाळा सुरू झाली, तरी प्रवेशाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे यंदा RTE प्रवेशाचा अडथळ्यांचा टप्पा काही संपत नाही. RTE प्रवेशाबाबत होणाऱ्या दिरंगाईमुळे पालक हैराण झाले आहेत.

Advertisement

प्रत्येक आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना आपल्या पाल्यास इतर मुलांसारखे चांगल्या दर्जाच्या शाळेत शिक्षण मिळावे, अशी इच्छा असते आणि RTE च्या माध्यमातून त्यांना ही संधी मिळत असते, त्यामुळे RTE प्रवेश कधी सुरू होतो, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील RTE प्रवेश प्रक्रिया कोर्टाच्या सुनावणीमुळे लांबणीवर पडली आहे. अनेक विद्यार्थी RTE प्रवेशामुळे शिक्षणा पासुन वंचित राहण्याची भीती वाटत आहे. अनेक विद्यार्थी घरीच असल्याने त्यांना शाळेत प्रवेशही घेता येत नसल्याने मोठा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. आज निकाल लागेल, उद्या निकाल लागेल या आशेवर अनेक पालक आहेत.

काही पालकांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणुन घेतल्या त्याच्या मते निकाल लागेल तेव्हां लागु दे,आत्ता लकी ड्रॉ काढुन प्रवेश प्रक्रिया पुर्ण करावी,जर निकाल वेगळा लागलाच तर जे पात्र नसतील ते फी भरतील किंवा वेगळा काही निर्णय घेतील,परंतु इतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. कारण सर्वच माध्यमाच्या शाळा चालु झाल्या असुन यंदाचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे, प्रवेश उशिरा झाला तर आमच्या पाल्याचे नुकसान होऊ शकते,त्यामुळे प्रवेश प्रक्रिया बाबत लवकरात-लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती सर्वच पालक शिक्षण विभागाला करत आहेत.

 

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!