30 वर्षांपासुन रखडलला पाणी प्रश्न अखेर मार्गी : किशोर गाथाडे
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक ५ मधील गेल्या तीस वर्षांंपासून पासून प्रलंबित असलेला सिद्धिविनायक नगरी ते परमार कॉम्प्लेक्स परिसरातील पाणी प्रश्न अखेर नुकताच मार्गी लावुन घेण्यात यश आले आहे.
सन २०१९ च्या निवडणुकीत मावळचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी आपल्या वाॅर्डातील नागरिकांना पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, त्यांच्याच कार्यकाळात ते पुर्ण देखील केले त्यानिमित्त सोमवार दिनांक १८/०३/२०२४ रोजी वडगाव मावळ येथे किशोर गाथाडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी आमदारांना प्रत्यक्ष भेटून पाच नंबर वाॅर्डातील सर्व नागरिकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून आनंद व्यक्त केला व त्यांचे आभार मानले.
आपली पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आमदार साहेबांचे विश्वासू सहकारी अतुल मराठे,देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट प्रवीण झेंडे,अॅडव्होकेट कृष्णा दाभोळे व इतर सहकाऱ्यांनी वेळी-वेळी सर्वपरी मदत केली.


