महाराष्ट्र

रस्ते व वाहतुक केंद्रिय मंत्र्यांच्या जिल्ह्यातच गावच्या रस्त्यांची दयनीय अवस्था


­प्रतिनिधी, कुही,नागपुर

  • दिलीप चव्हाण

नागपुर : मांढळ ता. कुही, जि. नागपुर गावच्या अंतर्गत रस्ते  पांदन रस्त्या पेक्षाही खराब असल्याने जनता त्रस्त, लोकप्रतिनिधी व्हाट्सऍप वर प्रसिध्दी मिळवण्यात व्यस्त अशीच काही अवस्था आहे.

व्यापारी नगरी मांढळ येथील वॉर्ड क्र.४ मधील रस्त्याची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, दुरुस्तीकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या रस्त्या बाबत अनेकदा ग्रामपंचायतीशी संपर्क करण्यात आला. परंतु केवळ आश्वासना शिवाय काहीच पदरी पडलेले नाही.

रस्त्याची हालत इतकी खराब झाली आहे की, बसस्थानका वरून घरी जायचे कसे? असा प्रश्न तेथील रहिवाशांना पडतो. एखाद्या शेतात जात आहोत की घरी जात आहोत हेच समजेनासे झाले आहे. कारण रस्त्याची स्थिती इतकी खराब झाली आहे की, अक्षरशः चिखल तुडवीत घर गाठावे लागत आहे.

Advertisement

रस्त्यात खड्डे पडल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यात असंख्य जीव जंतु, किटक तयार होऊन विविध रोगराईला आमंत्रण मिळत आहे. रस्त्याची दुरुस्ती एखादा व्यक्ती आजाराने ग्रासून मृत्युमुखी पडण्याची वाट पाहत आहे का ? असा संतप्त प्रश्न नागरिक करीत आहेत.

सध्या चिकन गुनिया सारख्या रोगाची सर्वत्र साथ पसरत आहे. तेव्हा येथील साचलेल्या पाण्यावर कोणते किटक तयार होतील व हा रोग पसरेल याची काही शास्वती देता येत नाही. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला अनेक वेळा माहिती दिली असता, या वार्डात निवडुन आलेल्या सदस्यानी किंवा इतर ग्रा.प.सदस्य फिरकून पाहायला तयार नाही, या वार्डात दोन महिला व एक पुरुष सदस्य आहेत. सदस्य फक्त आश्वासन देण्याचे काम करीत आहेत. आता रस्त्याची स्थिती एवढी बिघडलेली असताना कोणीच ग्रा.प.सदस्य फिरकून ही पाहत नाहीत, मात्र मत मागायला गल्लोगल्ली फिरतात यावरून नागरिकांच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो की ग्रामपंचायतचा कर भरायचा की नाही ? अशी मनः स्थिती येथील नागरिकांची आहे.

तातडीने या रस्ताची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रमोद पोहनकर व स्थानिक नागरीक करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!