क्राईम

भोर : वरवे खुर्द येथे घराचा कडी-कोयंडा तोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरी


सुनील सावंत
उपसंपादक

नसरापूर : भोर तालुक्यातील वरवे खुर्द येथे दि. 5 (मंगळवार) रोजी घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 1,90,000 रूपये किमतींचा ऐवज चोट्याने चोरून नेला आहे, या संदर्भात केतन अरुण कांबळे (वय 28 वर्ष) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ४:३० च्या सुमारास फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेले असताना त्यांच्या वरवे खुर्द येथील घराचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने तोडून घरामध्ये प्रवेश करुन १) १,००,००० रुपये किंमतीचे २ वाट्यांचे चैनीमधील मंगळसूत्र  २) ३५,०००  रुपये किंमतीचे काळे मन्याचे २ वाट्याचे मंगळसूत्र ३)  रोख रक्कम ५५,००० असा एकुण १,९०,००० रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे.

वरवे येथे भर दिवसा झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे गावामध्ये भितीचे वातावरण असुन घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करत आहेत.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!