ताज्या घडामोडी

ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी गाडे कुटुंबीयांकडून 2 तोळे सोन्याची राखी अर्पण


­

स्वप्निल भोसले,                                                              खेड, प्रतिनिधी.

आळंदी : पुणे येथील वाघोली गावातील गाडे कुटुंबीयांनी आज आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांना सोन्याची राखी अर्पण केली आहे. आज रक्षाबंधन सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रक्षाबंधन या पवित्र सणाला काही तरी वेगळे करावे या उद्देशाने 2 वर्षांपूर्वी गाडे यांनी या उपक्रमास सुरुवात केली होती,यंदा हे तिसरे वर्ष असुन त्यांच्या आई आणि मुलींच्या मनात आल्याने त्यांनी माऊलींना दर वर्षी सोन्याची राखी अर्पण करण्याचे ठरवले.

आज संत ज्ञानेश्वर महाराज  यांच्या समाधीची विधिवत पूजा करत गाडे कुटुंबीयांनी माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण केली.     यावेळी गाडे कुटुंबातील सर्वच जण माऊलींच्या दर्शनासाठी तसेच राखी अर्पण करण्यासाठी मंदिरात हजर होते.

Advertisement

रक्षाबंधन हा प्राचीन काळापासूनच हिंदू सण भाऊ आणि बहिणीच्या नात्याला साजरे करतो. वार्षिक उत्सवादरम्यान, बहिणी त्यांच्या पुरुष भावंडांच्या मनगटाभोवती राखी बांधतात. विधी बंधने मजबूत करण्यासाठी तसेच भावांना वाईटापासून संरक्षण मिळावे यासाठी प्रार्थना करत असतात,

गाडे कुटुंबीयांकडून संत ज्ञानेश्वर माऊली चरणी 2 तोळ्याची सोन्याची राखी आज अर्पण करण्यात आली. वाघोलीतील गाडे कुटुंबीयांचे माऊलीस चरणी सोन्याची राखी अर्पण करण्याचे हे तिसरे वर्ष आहे.

यावेळी देवस्थान विश्वस्त योगी निरंजनाथ, व्यस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने व संपत ज्ञानोबा गाडे, भिमाबाई ज्ञानोबा गाडे, स्नेहा गाडे, आदिती गाडे, गणेश गाडे, राज गाडे, वेदश्री गाडे, विलास गाडे, अद्विक गाडे इ. मान्यवर उपस्थित होते.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!