राजकीय

विद्यमान आमदारांनी फक्त स्वतःच्या घरच्यांनाच मोठे केले : शंकर मांडेकर


 

मुळशी : विद्यमान आमदारांनी आपल्या घरच्यांशिवाय दुसरं कोणाला मोठं केलं नाही. त्यामुळे आता आपल्याला योग्य निर्णय घ्यायची वेळ आली आहे. मी स्वतःपुरत न बघता अगोदर मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देईल, अशी ग्वाही महायुतीचे भोर विधानसभेचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी दिली.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर मुळशी तालुक्यातील ताथवडे, जांबे, नेरे कासारसाई, दत्तवाडी, मारुंजी, हिंजवडी या गावांना भेट दिली. यावेळी मांडेकरयांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. अनेक ठिकाणी त्यांच्यावर जेसीबी वरून पुष्पवृष्टी करण्यात आली. तर बैलगाडीवरुन मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.

Advertisement

मांडेकरांनी मतदारसंघातील गाव आणि सोसायटी मध्ये मतदारांची भेट घेतली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. मांडेकर म्हणाले की ” मुळशी तालुका पुणे शहराच्या जवळ असूनही मुळशीतील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मुळशी तालुक्यात औद्योगीकरण नसल्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील युवा पिढीला बाहेरच्या तालुक्यांमध्ये जावं लागतं. याला सर्वस्वी जबाबदार विद्यमान आमदार आहेत. त्यांनी केवळ त्यांच्या घरच्यांना मोठं केलं. रात्र वैऱ्याची आहे गाफील राहू नका, मतदारसंघाचा विकासासाठी मतदान करा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

यावेळी संतोष घोरपडे, जीवन कोंडे, दशरथ जाधव, सुनील गायकवाड, किरण राऊत, राजाभाऊ रेणुसे, सुनील शेंडकर, कुंदन गंगावणे, अंकुश मोरे, राजाभाऊ वाघ, दीपक कारंजावणे, गोविंद निकाळजे, नंदू भोईर , पै. राजाभाऊ जाधव, संदीप पवार, विजय गायकवाड, दीपक टेमगिरे, योगेश शिंदे, गणेश गायकवाड, बाळासाहेब भिंताडे, आनंदा लाटे, गणपत जगताप, सागर साखरे, कपिल बुचडे, सचिन जांभुळकर, दिनेश पिंजन, कौस्तुभ शिखरे, गणेश शिंदे, महिला भगिनी, ग्रामस्थ मंडळ, तरूण वर्ग, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!