राजगड तालुक्यातील अडवली येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न
अडवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमख्यमंत्री अजितदादा पावर यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक कोंढवा पुणे यांच्या सहकार्याने श्री.भैरवनाथ युवा प्रतिष्ठान अडवली आणि पै.गोपाळ इंगुळकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने व युवा नेते योगेशआबा इंगुळकर यांच्या पुढाकाराने राजगड तालुक्यातील अडवली गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
योगेशआबा इंगुळकर यांनी ग्रामीण भागात या शिबिराचे आयोजन केल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेता यावा हा मानस होता. शिबिरामध्ये शेकडो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे दिली गेली, तसेच विविध आरोग्याच्या समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन देखील केले.
नागरिकांना शिबिरामध्येच औषध उपचार केले गेले, तसेच काही नागरिकांना पुढील उपचारासाठी पुन्हा बोलवण्यात आले आहे. पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची तुकडी देखील दाखल झाली होती. नागरिकांना यानंतर ही विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून विविध वैद्यकीय समस्यांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत.
या शिबिरात बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक पुणे येथील डॉ. नितीन झोडगे ,श्री.संदीप हर्सुळे आणि सौ.सोनाली गाडे यांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी व उपचार केले. शिबिरामध्ये एकूण ६३ महिला व १५३ पुरुष रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले.
या उपक्रमास मा.सरपंच पै गोपाळ (नाना) इंगुळकर उपसरपंच संभाजी इंगुळकर, योगेशआबा इंगुळकर, देवराम इंगुळकर, मंगेश इंगुळकर, मोलाचे सहकार्य लाभले. गावातील अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते दशरथ काटकर, सचिन इंगुळकर, रविंद्र बढे, ऋषिकेश इंगुळकर,भरत काटकर शिबिराच्या आयोजनप्रसंगी उपस्थित होते. गावकरी बांधवांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पै.श्री.गोपाळ (नाना) इंगुळकर युवा मंच, राजगड तालुका आणि श्री. भैरवनाथ युवा प्रतिष्ठान, अडवली यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वत्र आभार व्यक्त होत आहेत.




