क्राईम

मामाच्या मुलांकडून नातलगास मारहाण ! राजगड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


 

किकवी : दि. 25 ऑक्टोबर पांडे (ता. भोर) येथे मामाच्या मुलांनी केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला असून या घटनेत सहा जणांविरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विनोद शेटीबा वाडकर (वय 38, रा. पांडे, ता. भोर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 2 वाजता त्यांच्या घरासमोर आरोपींनी आरडा-ओरडा करून गोंधळ घालत असताना फिर्यादी यांनी त्यांना समज दिल्यानंतर आरोपी 1) विनोद शंकर भिंगारे 2)रविंद्र शंकर भिंगारे 3) प्रकाश शंकर भिंगारे 4) विजय बबन वाडकर (सर्व रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) तसेच फिर्यादीचा भाऊ 5) प्रल्हाद शेटीबा वाडकर आणि पत्नी 6) रेणुका प्रल्हाद वाडकर (रा. पांडे, ता. भोर) यांनी एकत्र येऊन बेकायदेशीर गर्दी केली.यानंतर सर्वांनी मिळून विनोद वाडकर यांना लाकडी बॅट व मातीच्या विटांनी मारहाण केली, शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने सांगितले.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून तक्रार नोंदवली आहे.या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गु.र.नं. 385/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहितेचे कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 190, 189(2), 191(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलीस हवालदार खरात (1842) यांनी प्राथमिक कारवाई केली असून प्रकरणाचा पुढील तपास हवालदार कोल्हे (एचसी 1860) करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!