भोर तालुक्यातील पुणे येथील रहिवाशांचा संवाद मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर विधानसभेतील राजकीय वातावरण जोरदार तापले असून आशातच आता इच्छुक उमेदवारांकडून विविध मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे, भोर तालुक्यातील पुणे येथील रहिवासी नागरिकांच्या संवाद मेळावा दि. 20/10/24 (रविवार) रोजी सायंकाळी 7 वाजता राधाकृष्ण गार्डन, कात्रज येथे पार पडल
संग्राम थोपटे हे 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असुन त्याअगोदर संवाद मेळावाचे आयोजन केले होते. पुणे शहरात वास्तव्यास असणान्या भोर तालुक्यातील नागरिकांनी या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याच अनुषंगाने भोर तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.भोर-राजगड-मुळशी तालुक्यात रोजगार उपलब्ध नाही पर्यटन नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता, थोपटे यांनी पुढें सांगितले की काही लोक फक्त स्वतः च्या स्वार्थासाठी माझ्यावर खोटे आरोप करत आहेत काही समाजसेवक फक्त इलेक्शन आले की जागे होतात, कारखान्याला कर्ज उपलब्ध झाले होते परंतु काही लोकांनी ते देऊ नये म्हणुन प्रयत्न केले, एमआयडीसी करिता जागा द्यायची वेळ आली की स्थनिक राजकारणी अडचण निर्माण करतात, हे सर्व आरोप बिनबुढाचे असल्याचे म्हंटले, शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडले अशा या गद्दारांना भोर-राजगड- मुळशीची जनता धडा शिकवल्या शिवाय गप्प बसणार नाही, पुणे शहरात आयोजित केलेल्या संबाद मिळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करून संग्राम थोपटेंना एक प्रकारे पाठिंबा असल्याचे दर्शविले, मागील दोन निवडणुकांचा विचार केला तर भोर तालुक्यानेच संग्राम थोपटे यांना तारलेले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेते मानसिंगबाबा धुमाळ म्हणाले विरोधकांना अजूनही माहित नाही की उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार आहे प्रत्येक जण गुढघ्याला बाशिंग बांधून बसला आहे, आमच्या आघडीचा उमेदवार संग्राम थोपटे असुन फक्त उमेदवारी अर्ज भरायचा आहे, आणि स्वतः शरद पवार साहेब संग्राम थोपटे यांच्या बरोबर असल्याने त्यांचा विजय हा निश्चित आहे. फक्त गुलाल उधळायचे बाकी आहे. भोर तालुक्याने सुप्रिया सुळे यांना जितक्या मतांची आघाडी दिली तेव्हढ्याच मताधिक्याने संग्राम थोपटे विजयी होतील.
याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते मानसिंगबाबा धुमाळ, भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे, भोर पंचायत समितीचे मा. सभापती बाळासाहेब थोपटे, मा.जिल्हा परीषद सदस्य वंदना धुमाळ, भोर पंचायत समितीचे सभापती लहुनाना शेलार, उपसभापती रोहन बाठे, मा. जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, गीतांजली आंबवले, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, काकासाहेब चव्हाण, राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन पोपटराव सुके, संचालक उत्तमराव थोपटे, मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती धनंजय वाडकर, भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदा आंबवले, उपसभापती ईश्वर पांगारे, सा. कार्यकर्ते अनिलनाना सावले, माऊली दारवडकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे, व्हा. चेअरमन अतुल शेडगे, संचालक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पावर पक्ष कार्याध्यक्ष संदीप नांगरे, रोहिदास जेधे, महिला अध्यक्षा विद्याताई यादव, युवक अध्यक्ष गणेश खुटवड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्हा युवती अध्यक्ष दुर्गा चोरघे, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह कार्यकर्ते, भोर तालुक्यातील पुणे स्थित रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




