क्राईम

पुण्यात स्वयंघाेषित सर्पमित्रांचा सापांच्या जीवाशी खेळ ; कचरा पेटीतूनच सापांची देवाण-घेवाण करण्यात येत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास


पुणे : दिनांक 23/12/2024 (सोमवार) राेजी सागर दिक्षित यांना खडीमशीन चाैकात बधेनगर येथे भंगार वेचणारी बाई घाबरून ओरडताना निदर्शनास आली, ती बाई भंगार गोळा करत आसलेल्या कचऱ्याच्या  पिशवीमध्ये साप होते आणि त्यामुळे च ती घाबरून आरडा ओरडा करत होती, सागर दिक्षित यांनी बघितले तर पिशवीमध्ये 4 बरण्यांमध्ये साप टाकून दाबून ठेवलेले दिसले. अशा परिस्थितीमध्ये त्याने सागर बावळे यांना संपर्क केला व घटनास्थळी येण्याची विनंती केली ते काही वेळेत पाेचल्यावर त्यांनी व्यवस्थित पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की काेणी सर्प पकडणाऱ्यानेच हे काम केलेले आहे. कारण सर्प ठेवलेल्या बरणीस हाेल वगैरे हाेते.

Advertisement

परिसरातील आजूबाजूला चाैकशी केली असता काही लाेकांनी साेनू साठे नावाच्या सर्पमित्राचे नाव घेतले, त्याला फोन करून विचारले असता त्यांने आपण काही ही केले नसल्याचे सांगू लागला त्या नंतर त्याला नीट विचारपूस केली असता
त्याने नंतर केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि तो सापाचा वापर साेशल मीडियावर व्हिडिओ काढण्यासाठी तसेच इतर सर्व मित्रांसाेबत फोटो वगैरे काढण्यासाठी करत असल्याचे सांगितले.
दुसऱ्या सर्पमित्राला हे साप देण्यासाठी रस्त्याच्या कडेला कचराकुंडीत ठेवलेले हाेते जेणेकरून काेणाला संशय येणार नाही. तसेच ते सर्व साप मानस कंठाळे  नावाची व्यक्ती नेणार हाेती.

वनविभाग कर्मचारी यादव, जाधव यांच्या मदतीने सागर दिक्षित, हर्षदा आवताडे, अभिषेक खंडेलवाल,गणेश माटे व इतर सहकारीनी मिळुन या सापाची सुटका केली. स्वयंघाेषित सर्पमित्रांवर सर्प बेकायदेशररित्या डाबून ठेवल्याबद्दल व सापांंच्या जिवाशी खेळण्याबाबत गुन्हे दाखल करणार असल्याचे वनविभागाच्या  अधिाऱ्यांनी सांगितले आहे व वनविभागाने पुढील उपचारासाठी सर्व सापांना वन्यजीव सरकारी हाॅस्पिटल मध्ये दाखल केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!