क्राईम

सिंधुताईंच्या आश्रमातील मुलींशी लग्न लावून देतो म्हणत ; तरुणांची फसवणुक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल


ऋषिकेश जगताप,
सासवड.

सासवड : सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत एका भामट्याने अनेक पालक व तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी समोर आला होता, आखेर त्याच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरूणांना किंवा त्यांच्या पालकांना सिंधुताई सपकाळ आश्रमातील मुलींच्या  संदर्भात खोटी माहिती देवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशनच्या नावाखाली 15,000 रुपये घेत होता.

Advertisement

लग्नासाठी इच्छुक मुलांच्या पालकांची व नातेवाईकांची होणारी ही फसवणूक गंभीर असल्याचे पाहायला मिळत असुन समाजात मुलांच्या लग्नासाठीचा गंभीर प्रश्न असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुलांच्या लग्नासाठी पालक, नातेवाईक मुलगी मिळावी म्हणून अनेक मध्यस्थीना पैसे देण्यास तयार असतात.सपकाळ यांच्या फिर्यादवरून आखेर दोन दिवसांनी आरोपी विरोधात 319 (4), 318 (4), 356 (2), आयटी ऍक्ट 66 या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधुताईं सपकाळ यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ, व गोरगरिबांच्या लेकरांसाठी व्यतित केलं. त्या सिंधुताईंच्या आश्रमा संदर्भात एवढा मोठा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करायला दोन दिवस का लागले, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!