नवसह्याद्री गुरुकुलच्या स्काऊट गाईड युनिटची माऊली अनाथ आश्रमास भेट
नसरापुर : शनिवारी दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी नवसह्याद्री गुरुकुल आणि जुनियर कॉलेजच्या स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थ्यांकडून माऊली अनाथ आश्रम माळेगाव येथे अनाथ विद्यार्थ्यांना जेवणासाठी तांदूळ व विविध डाळी तसेच जीवनावश्यक वस्तू भेट स्वरुपात देण्यात आल्या.
नवसह्याद्री गुरूकुल मध्ये या वर्षी स्काऊट व गाईड पथक सुरू केले असुन त्या अंतर्गत अनेक सामजिक उपक्रम राबविले जात आहेत, जसे खरी कमाई, स्वच्छता सप्ताह, गड – किल्ले भ्रमंती इ. असे अनेक उपक्रम राबवीले जात असल्याने भोर तालुक्यामध्ये त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
विदयार्थ्यांना सामाजिक जबाबदारी हे मूल्य विकसित करण्याच्या हेतूने माळेगाव येथील नवनाथ महाराज लिम्हन यांच्या माऊली अनाथाश्रमच्या मुलांना सदिच्छा भेट म्हणून जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आश्रमातील पिलावडे महाराज यांनी पूर्ण आश्रमाची माहिती मुलांना दिली, येथील अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर संगीत व इतर जीवनोपयोगी कौशल्याचे शिक्षणही दिले जाते.
आश्रमातील व शाळेतील विदयार्थ्यांना गाईड कॅप्टन जयश्री भावेकर यांनी सामाजिक कर्तव्याबाबत विदयार्थ्यांना संबोधित केले स्काऊट मास्टर समीर शेख , महेश्वर जाधव व सविता येवले यावेळी उपस्थित होते.आश्रमातील सिनियर विद्यार्थी आर्यन गोरड यांनी सर्वांचे आभार मानले.
शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा धुमाळ , डायरेक्टर सानवीताई सुके यांच्या मार्गदर्शाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.




