सामाजिक

छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई धाराऊ माता गाडे यांचे वंशज अमित गाडे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित


नवी मुंबई : छावा प्रतिष्ठानचे छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दरवर्षी दिला जाणारा छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार यंदाचा (2025) छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई धाराऊमाता गाडे यांचे वंशज अमित गाडे यांना बुधवार दि. 21 मे रोजी नवी मुंबई येथे देऊन सन्मानित करण्यात आले.

समाजरत्न पुरस्कार हा महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो आणि विशिष्ट सामाजिक कार्यासाठी समाजरत्न पुरस्कार दिला जातो, अमित गाडे हे राज्यभर फिरुन विविध माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे काम करत असतात. तसेच गोरक्षण करणे, गोशाळामधिल गाईंना चारा व औषधाची सोय करणे, वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून अनाथ व गोर-गरीब विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्य वाटप आदींसह इतर उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत असतात, त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.

Advertisement

अमित गाडे यांना या पुरस्कारामुळे सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल आणि लोकांसाठी सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल या पुरस्कारांमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल आणि त्यांच्याकडून राज्यभरतील लोकांच्या हिताचे काम होइल अशा शुभेच्छा छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमित गडांकुश यांनी सांगितले.

स्वराज महाराष्ट्र न्युजशी बोलतांना अमित गाडे यांनी सांगितले की समाजरत्न पुरस्कार हा समस्त कापूरहोळ ग्रामस्थांचा असुन पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी एक खूप मोठा मान आहे. माझी या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल छावा प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानतो. मी गेली अनेक वर्षे समाजासाठी काम करत आहे, आणि या कामात मला नेहमीच खूप आनंद आणि समाधान वाटले आहे. या पुरस्कारामुळे माझ्या कामाची नोंद झाली आहे, आणि मला भविष्यातही समाजासाठी अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.मी माझ्या कामासाठी माझ्या कुटुंब, मित्र आणि सहकारी यांचे विशेष आभार मानतो. त्यांच्या मदतीने आणि सहकार्याने मी हे काम करू शकलो.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!