ताज्या घडामोडी

गुंजन मावळामध्ये आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन ! दिवंगत आमदार काशिनाथराव खुटवड यांच्यानंतर प्रथमच भरघोस निधी उपलब्ध


गुंजन-मावळ : बुधवार (१५ ऑक्टों.) गुंजन-मावळामध्ये सुमारे साडे १२ कोटी ५३ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते झाले, कासुर्डी-मोहरी-हातवे बुद्रुक या रस्त्याच्या कामाकरिता तब्बल ७ कोटी ९५ लाख रुपये तर हातवे बुद्रुक ते दीडघर या रस्त्याकरिता ४ कोटी ५८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत,आगामी पुणे ग्रँड चॅलेंज टूर (सायकल स्पर्धा) याच रस्त्याने होणार आहे.

या भागातील रस्त्यांच्या उभारणीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवास सुरक्षित व जलद गतीने होणार असून या कामामुळे स्थानिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे. यावेळी ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सहकाऱ्यांचे आभार मानले व त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच विविध विकास कामांमध्ये कासुर्डी, तेलवडी, मोहरी खुर्द, मोहरी बुद्रुक या ४ गावांच्या नवीन होत असलेल्या तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन आमदार मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

निवडणुकीमध्ये पक्षाचे काम, इतर वेळी राजकारणाचे जोडे बाजूला ठेऊन व कोण कोणत्या पक्षाचा आहे, हे न बघता नागरिकांचे कामे प्रामाणिकपणे करत असतो, जिल्हा नियोजन समितीमध्ये असताना कोणताही भेदभाव न करता निधीचे योग्य प्रकारे वाटप केले आहे. डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेऊन जनतेची कामे करत आहे.                                                   विक्रम खुटवड
मा.उपसभापती – भोर पंचायत समिती.
सदस्य – जिल्हा नियोजन समिती पुणे.

आपल्या विचाराचा प्रतिनिधी असल्यानंतर विकास कामांची गती वाढते, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले, त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून भरगोस निधी प्राप्त करू शकलो, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून आणले पाहिजेत त्यामुळे तालुक्याचा विकास आणखीन वेगाने होईल.   शंकर मांडेकर,
आमदार भोर विधानसभा.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!