ताज्या घडामोडी

कामथडी-भोंगवली गटातून महादेव सोनवणे भाजप तिकिटासाठी इच्छुक ! कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही


 

कापूरहोळ : भोर तालुक्यातील कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे पुन्हा एकदा हलू लागली आहेत. या मतदारसंघातून महादेव किसन सोनवणे यांनी भाजप तिकिटासाठी आपली अधिकृत इच्छुकता जाहीर करत चर्चांना उधान आणले आहे.
संग्राम थोपटे घराण्याशी गेली चार दशके निष्ठा राखणारे सोनवणे यांनी सांगितले की, त्यांनी नेहमीच पक्षनिष्ठा व कार्यनिष्ठा जोपासली असून याच आधारावर तिकीट मागितले आहे.सोनवणे यांना खात्री आहे की माजी आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या दीर्घकाळाच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा विचार करून त्यांना तिकीट देतील.

के.डी. सोनवणे यांनी गेली चाळीस वर्षे विविध सामाजिक उपक्रमांमधून मतदारसंघात मजबूत जनसंपर्क निर्माण केला आहे. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकास क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे त्यांनी ग्रामस्थांचा विश्वास जिंकला आहे.

कामथडी-भोंगवली मतदारसंघात आजपर्यंत भाजपला जिल्हा परिषदेवर विजय मिळविता आलेला नाही. मात्र यावेळी ही परंपरा तोडून पक्षाचा ध्वज उंचावण्याचा निर्धार सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी पंचायत समितीच्या दोन्ही जागांवरही विजय मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

Advertisement

भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सध्या सोनवणे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे, सर्वसामान्यांशी असलेल्या घनिष्ठ नात्यामुळे आणि सातत्यपूर्ण जनसेवेच्या भूमिकेमुळे पक्षाला यंदा नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. सोनवणे यांच्या उपस्थितीमुळे मतदारसंघातील राजकीय संतुलनाला नवा रंग मिळणार असून, आगामी निवडणुकीत त्यांची कामगिरी निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कामथडी व भोंगवली परिसरातील शेतकरी, युवक आणि महिलांमध्येही त्यांच्या कार्याचा मोठा आदर आहे. सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी पक्षकार्याला चालना दिली असून त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात एकात्मता, विकास आणि पक्षविस्तार यांचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले.

महादेव सोनवणे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि पक्षाच्या मजबुतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे भोर तालुक्यातील राजकीय वातावरणात आता मागे हटणार नाही त्यांच्या या घोषणेने नवे समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!