ताज्या घडामोडी

कापूरहोळ चौकात जीवघेणे खड्डे : वाहन चालक व स्थानिक नागरिक त्रस्त


कापूरहोळ : पुणे-बेग्लोर हायवे लगत असणाऱ्या कापूरहोळ चौक ते भोर फाटा या रस्त्यावर जाग जागी मोठ-मोठे खड्डे पडले असून, रात्रीच्या वेळी वाहनधारकांना छोट्या-मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तसेच, परिसरातील सर्व्हिस रस्त्यांची सुद्धा दुरवस्था झाली असून वारंवार दुरुस्तीची मागणी केली आहे, कापूरहोळ परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करण्याबरोबरच अपघातासह वाहनांच्या होत असलेल्या नुकसानामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रोजच छोटे मोठे अपघात होत असुन झोपलेल्या प्रशासनाने वेळीच जागे व्हावे.

Advertisement

हायवे तसेच सर्व्हिस रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे खड्डा दिसत नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटनाही होऊ शकते. दुचाकी, चारचाकी वाहन चालकाला मोठा धोका पत्करावा लागतो. अनेक वेळा या खड्ड्यामुळे अपघातही झाले आहेत. संबंधित विभागने हे खड्डे बुजवावे व परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!