ताज्या घडामोडी

आमदार शंकर मांडेकर यांचा जनता दरबार ! भोर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


 

भोर : भोर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या विविध प्रश्न-समस्या जाणून घेण्यासाठी आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते, या जनता दरबारात सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला, नागरिकांनी आप-आपले प्रश्न मांडले असता नागरिकांच्या या प्रश्नांवर संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा करत त्यांचे योग्य तोडगे काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक संवाद साधण्यात आला.

नागरिकांनी महावितरणच्या वीज पुरवठ्याबाबत आपल्या व्यथा मांडल्या सतत वीजपुरवठा खंडित केला जातो, भोर शहरात पाणी पुरवठ्या नियमित होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. यादरम्यान नागरिकांनी मुख्याधिकारी नगरपालिकेत हजर नसतात  त्यांचे कर्तव्यावर दुर्लक्ष असल्याचा आरोप केला व शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि विकासकामे गतीमान करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन गरजेचे असल्याचेही म्हटले.

Advertisement

नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कामात चुका व वेळ खाऊपणा करू नका, महिला व ज्यष्ठ नागरिकांनाज व्यवस्थित सेवा देण्याचे काम करा, तुम्हाला पाहिजे तेवढा फंड उपलब्ध करून देतो, फंड कोठे व किती लागतोय ते सांगा, मी उपमुख्यमंत्री, पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून वाढीव फंड स्वरूपात आणून देण्याचे काम करेल, परंतु तुम्ही तुमच्या कामात पारदर्शकता ठेवा तसेच कामात काही चुका केल्या किंवा कामात उशिर केल्याचे अगर एखाद्या नागरिकास ना कारण भेटीस धरले तर ते मी खपवून घेणार नाही असा सज्जड दम ही आमदार शंकर मांडेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

यावेळी मा. पुणे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी वाहतुकी बाबतीत शिंदेवाडी महाड रस्त्याच्या दरम्यान भोर शहराजवळील उत्रौली फाटा ते महाड अंतरावरील रस्त्याची रुंदी १९ मीटर होणार असल्याने वाहतूक सुरळीत होऊ शकेल आणि भोर शहरातील जनतेचे वीज, पाणी तसेच ट्रॅफिकचा महत्त्वाचा प्रश्न व तरुणांना रोजगाराच्या बाबतीत असणाऱ्या समस्या आमदार मांडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून तत्काळ सोडवणार असल्याचे  सांगितले.

जनता दरबाराला प्रांत अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, भोर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. यासोबतच जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मा.आदर्श जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत बाठे, भोर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक यशवंत डाळ, शहराध्यक्ष संदीप शेटे, माजी शहराध्यक्ष केदार देशपांडे, सोमनाथ ढवळे, कुणाल धुमाळ, अतुल काकडे, यांच्यासह आज माझी पदाधिकारी व सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!