राजकीय

शंकर मांडेकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात,जंगी सभा घेणार


मुळशी : 203 भोर-राजगड(वेल्हा)- मुळशी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व मित्र पक्षाचे भोर विधानसभा मतदासंघांतील उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार 10 नोव्हेंबरला (रविवार) मैदानात उतरणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांना बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शंकर मांडेकर यांनी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी काही तास आगोदर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना लगेच अजित पवार यांच्याकडून भोर विधानसभा मधून विधानसभेचं तिकीट देण्यात आले.

शंकर मांडेकर यांच्याविरोधात संग्राम थोपटे यांचं तगडं आव्हान असणार आहे. मांडेकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भोर विधानसभेत उमेदवारी देण्यात आली आहे

दरम्यान दुसरीकडे ऐनवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेल्या शंकर मांडेकर यांना उमेदवारी मिळाल्यानं पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज आहेत, या नाराजीचा फटका हा यांना निवडणुकीत बसू शकतो, त्यामुळे आता स्वतः अजित पवार हे शंकर मांडेकर यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत.

Advertisement

महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला गेल्याने व शंकर मांडेकर यांना उमेदवारी भेटल्याने नाराज होते, भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार किरण दगडे व शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे हे दोघं आपआपल्या पक्षांना जागा न सुटल्याने त्यांनी अपक्ष निवडणुकीचा फॉर्म भरला. या काही करणामुळे अजित पवार हे शंकर मांडेकर यांच्या प्रचारामध्ये मैदानात उतरणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी,शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर घटक पक्ष, महायुतीचे 203 भोर विधानसभा मतदारसंघाचे अधिकॄत लोकप्रिय उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार यांची जाहिर सभा रविवार दिनांक 10/11/2024 रोजी दुपारी 2:00 वाजता. दत्तकॄपा मंगल कार्यालय, हनुमान चौक,घोटावडे, ता. मुळशी येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुती तर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!