क्राईम

वेळू येथील सुबोधन इंजिनिअर्स कंपनीत तब्बल ४:४२ लाखांचा माल चोरीस


 

शिवापूर : वेळू, ता.भोर, जि. पुणे येथील सुबोधन इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून अज्ञात चोरट्याने तब्बल ४ लाख ४२ हजार ८६ रुपयांचा मौल्यवान इलेक्ट्रॉनिक माल लंपास केल्याची घटना उघड झाली आहे.ही चोरी ता. २१ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजल्यापासून ते ता. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजेच्या दरम्यान घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Advertisement

कंपनी बंद असताना अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप कापून आतील भागात प्रवेश करून कंपनीतील ॲल्युमिनियम पट्ट्या, कॉपर वायर व कॉपर लग्स असा एकूण माल चोरून नेला.चोरी गेलेल्या वस्तूं पैकी ॲल्युमिनियम पट्ट्या (११ फूट लांबीच्या ४० पट्ट्या, अंदाजे ४०० किलो) किंमत रुपये २,०७,९८४/- कॉपर वायर (पांढरे व काळे रंगाचे २० बंडल) किंमत २,०९,१०२/- रुपये कॉपर लग्स (१००० नग) किंमत ₹२५,०००/- असा एकूण ४,४२,०८६/- रुपयांचा माल गायब झाला आहे.या प्रकरणी अभिजित राजेंद्र हर्षे (वय ३५, रा. पुणे) यांनी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गु.र. क्र. ३८८ /२०२५असा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादींच्या माहितीनुसार चोरट्याने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने कंपनीत घरफोडी करून माल चोरी केला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अमलदार मुंडे व तपासी अधिकारी राठोड करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!